SAVE RANI BAGH BOTANICAL GARDEN FOUNDATION
मुंबईतील सर्वात मोठा वृक्ष-समूह असलेले वारसा दर्जाचे एकमेव वनस्पती उद्यान आणि सर्वात मोठा, सार्वजनिक व हरित भूखंड अशी बिरुदे मिरवणारी राणीची बाग –तिला मानवंदना म्हणून राणीबाग १५० वर्षे हे पुस्तक प्रकाशित झाले. शहराच्या गजबजलेल्या भागात असा हा अमूल्य ठेवा तब्बल १५० वर्षे टिकून राहाणे निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यामुळेच राणीच्या बागेचे ऐतिहासिक, सांस्कृतिक व वैज्ञानिक महत्व व मुंबईकरांच्या हृदयात असलेले तिचे स्थान लक्षात घेता तिचा हा कौतुकसोहळा आवश्यकच आहे.

या पुस्तकातील विविध लेखांमधून त्या-त्या लेखकांच्या नजरांनी टिपलेली राणीच्या बागेची विविध वैशिष्टये मांडलेली आहेत. या लेखकांनी राणीच्या बागेत स्वत: घेतलेल्या तसेच सर्व थरांतील व सर्व वयोगटांतील मुंबईकरांच्या जीवनातीलआनंदानुभवाचा मागोवा त्यांच्या लेखांत घेतलेला आहे. राणीच्या बागेचा सुरवातीचा इतिहास, नियोजन व रचना या आजही तितक्याच महत्त्वाच्या असलेल्या गोष्टी अतिशय रोचकपणे वर्णिलेल्या आहेत. शिवाय गेली १५० वर्षे मुंबईकरांचे सांस्कृतिक जीवन समृद्ध करणार्याे उद्यानाच्या सातत्यपूर्ण परंपरेला दिलेली मानवंदना ही या पुस्तकात आहे. एक मोठा लेख राणीच्या बागेतील समृद्ध वनस्पती-विश्वाची उत्कंठावर्धक सफर आपल्याला घडवतो तर दुसर्यान एका लेखात या उद्यानात निवास करणार्या-प्राणी-जगताविषयीची विस्मयकारक माहिती मिळते. पुस्तकातील अखेरच्या लेखात या उद्यानातील वैशिष्टयपूर्ण निसर्गदत्त हरित वारसा आणि मानवनिर्मित वास्तुवारसा यांच्या संरक्षणासाठी अलीकडेच केलेल्या संघर्षाची साद्यंत माहिती दिलेली आहे.

राणीबाग १५० वर्षे

प्रकाशन वर्ष : २०१३

पृष्ठे : १६०

छायाचित्रे : २००

किंमत : रुपये १८००

सवलतीतील किंमत : रुपये १०००

आकार : ९.५ इंच x १३ इंच (पुठ्ठा बांधणी)

संपादक :
हुतोक्षी रुस्तमफ्राम
शुभदा निखार्गे

प्रकाशक :
बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी
नॅशनल सोसायटी ऑफ द फ्रेंड्स ऑफ द ट्रीज
सेव्ह राणीबाग बोटॅनिकल गार्डन फाउंडेशन

वितरक:
लोकवाड्.मय गृह प्रा. लि.

खालील ठिकाणी रुपये १००० या सवलतीच्या किंमतीत उपलब्ध
  1. महाराष्ट्रातील मराठी पुस्तक विक्रेते
  2. बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी (info@bnhs.org)
  3. नॅशनल सोसायटी ऑफ द फ्रेंड्स ऑफ द ट्रीज (friends@friendsoftreesindia.org)
  4. सेव्ह राणीबाग बोटॅनिकल गार्डन फाउंडेशन (info@saveranibagh.org)


Save Rani Bagh Botanical Garden Foundation
info@saveranibagh.org